सेवा माहिती अधिकार
नागरिकांविषयी
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला असून तो दि. 28.04.2015 पासून अंमलात आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे त्याचे उद्दिष्ट आहे. वरीलप्रमाणे अधिसूचित सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत किंवा नाही यावर देखरेख, समन्वय, सनियंत्रण ठेवण्यासाठी व या संदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी उपरोक्त कायद्यान्वये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करण्यात आला असून आयोगामध्ये एक मुख्य आयुक्त व सहा आयुक्त कार्यरत आहेत. आयोगाचे मुख्यालय नविन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई येथे असून सहा विभागातील मुख्यालयाच्या ठिकाणी आयुक्तांची कार्यालये आहेत. पात्र नागरीकांना विहित वेळेत सेवा न मिळाल्यास अथवा नियमोचित कारणाशिवाय ती नाकारल्यास अशा निर्णयाविरुद्ध संबंधितांना वरीष्ठांकडे प्रथम व द्वितीय अपिल करता येते व तरीही समाधान न झाल्यास आयोगाकडे तृतीय अपिल करता येते. कसूरदार अधिकाऱ्यास प्रतिप्रकरण रु. 5000/- पर्यंत दंड होऊ शकतो. या विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसुचित सेवांची यादी सोबतच्या प्रपत्रात दिली आहे. महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाची वेबसाईट खालीलप्रमाणे आहे :-
| अनु क्रा. | विभाग | सेवा | 
|---|---|---|
| १ | ग्रामीण विकास विभाग | जन्म नोंदणी प्रमाणपत्र | 
| २ | ग्रामीण विकास विभाग | मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र | 
| ३ | ग्रामीण विकास विभाग | विवाह नोंदणी प्रमाणपत्र | 
| ४ | ग्रामीण विकास विभाग | दारिद्र्यरेषेखालील असल्याचा पुरावा | 
| ५ | ग्रामीण विकास विभाग | ग्रामपंचायत अद्याप आली नसल्याचा पुरावा | 
| ६ | ग्रामीण विकास विभाग | नमुना ८ चा उतारा | 
| ७ | ग्रामीण विकास विभाग | निराधार असल्याचा पुरावा | 
| ८ | महिला आणि बाल विकास विभाग | अंगणवाड्यांमधील गर्भवती महिलांच्या नावाची नोंदणी | 
| ९ | महिला आणि बाल विकास विभाग | अंगणवाडीत ०६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील मुलांची नोंदणी | 
| १० | महिला आणि बाल विकास विभाग | अंगणवाडीत ०३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांची नोंदणी | 
| ११ | महिला आणि बालविकास विभाग | सबला योजनेअंतर्गत किशोरवयीन मुलींची नोंदणी | 
| १२ | महिला आणि बालविकास विभाग | किशोरी शक्ती योजनेअंतर्गत मुलींची नोंदणी | 
| १३ | पाणी, पुरवठा आणि स्वच्छता विभाग | नवीन पाणी कनेक्शन | 
| १४ | पाणी, पुरवठा आणि स्वच्छता विभाग | मालकी हक्क बदलणार | 
| १५ | पाणी, पुरवठा आणि स्वच्छता विभाग | पाणी कनेक्शनचा आकार बदलणार | 
| १६ | पाणी, पुरवठा आणि स्वच्छता विभाग | तात्पुरते/कायमस्वरूपी पाणी कनेक्शन तोडणार | 
| १७ | पाणी, पुरवठा आणि स्वच्छता विभाग | कनेक्शन पुन्हा जोडणार | 
| १८ | पाणी, पुरवठा आणि स्वच्छता विभाग | वापरात बदल | 
| १९ | सार्वजनिक आरोग्य विभाग | जननी सुरक्षा योजना | 
| २० | सार्वजनिक आरोग्य विभाग | जननी शिशु सुरक्षा योजना | 
| २१ | सार्वजनिक आरोग्य विभाग | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, अंतर्गत उपचारांसाठी नोंदणी, ई-पूर्वअधिकृतीकरण, आपत्कालीन उपचारांसाठी दूरध्वनीद्वारे नोंदणी | 
| २२ | शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग | माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालेय प्रमाणपत्र परीक्षा II गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे | 
| २३ | शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग | माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालेय प्रमाणपत्र परीक्षा तात्पुरती प्रमाणपत्र | 
| २४ | शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग | माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालेय प्रमाणपत्र परीक्षेतील गुण पडताळणी | 
| २५ | शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग | माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालेय प्रमाणपत्र परीक्षेच्या निकालानंतर उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मिळवणे | 
| २६ | शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग | परीक्षेला बसणारे खाजगी उमेदवार | 
| २७ | कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभाग | पशुवैद्यकीय रुग्णावर प्रथमोपचार |