बंद

    सेवा माहिती अधिकार

    नागरिकांविषयी

    महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला असून तो दि. 28.04.2015 पासून अंमलात आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे त्याचे उद्दिष्ट आहे. वरीलप्रमाणे अधिसूचित सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत किंवा नाही यावर देखरेख, समन्वय, सनियंत्रण ठेवण्यासाठी व या संदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी उपरोक्त कायद्यान्वये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करण्यात आला असून आयोगामध्ये एक मुख्य आयुक्त व सहा आयुक्त कार्यरत आहेत. आयोगाचे मुख्यालय नविन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई येथे असून सहा विभागातील मुख्यालयाच्या ठिकाणी आयुक्तांची कार्यालये आहेत. पात्र नागरीकांना विहित वेळेत सेवा न मिळाल्यास अथवा नियमोचित कारणाशिवाय ती नाकारल्यास अशा निर्णयाविरुद्ध संबंधितांना वरीष्ठांकडे प्रथम व द्वितीय अपिल करता येते व तरीही समाधान न झाल्यास आयोगाकडे तृतीय अपिल करता येते. कसूरदार अधिकाऱ्यास प्रतिप्रकरण रु. 5000/- पर्यंत दंड होऊ शकतो. या विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसुचित सेवांची यादी सोबतच्या प्रपत्रात दिली आहे. महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाची वेबसाईट खालीलप्रमाणे आहे :-

    आपले सरकार

    सेवा हक्क माहिती
    अनु क्रा. विभाग सेवा
    ग्रामीण विकास विभाग जन्म नोंदणी प्रमाणपत्र
    ग्रामीण विकास विभाग मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र
    ग्रामीण विकास विभाग विवाह नोंदणी प्रमाणपत्र
    ग्रामीण विकास विभाग दारिद्र्यरेषेखालील असल्याचा पुरावा
    ग्रामीण विकास विभाग ग्रामपंचायत अद्याप आली नसल्याचा पुरावा
    ग्रामीण विकास विभाग नमुना ८ चा उतारा
    ग्रामीण विकास विभाग निराधार असल्याचा पुरावा
    महिला आणि बाल विकास विभाग अंगणवाड्यांमधील गर्भवती महिलांच्या नावाची नोंदणी
    महिला आणि बाल विकास विभाग अंगणवाडीत ०६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील मुलांची नोंदणी
    १० महिला आणि बाल विकास विभाग अंगणवाडीत ०३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांची नोंदणी
    ११ महिला आणि बालविकास विभाग सबला योजनेअंतर्गत किशोरवयीन मुलींची नोंदणी
    १२ महिला आणि बालविकास विभाग किशोरी शक्ती योजनेअंतर्गत मुलींची नोंदणी
    १३ पाणी, पुरवठा आणि स्वच्छता विभाग नवीन पाणी कनेक्शन
    १४ पाणी, पुरवठा आणि स्वच्छता विभाग मालकी हक्क बदलणार
    १५ पाणी, पुरवठा आणि स्वच्छता विभाग पाणी कनेक्शनचा आकार बदलणार
    १६ पाणी, पुरवठा आणि स्वच्छता विभाग तात्पुरते/कायमस्वरूपी पाणी कनेक्शन तोडणार
    १७ पाणी, पुरवठा आणि स्वच्छता विभाग कनेक्शन पुन्हा जोडणार
    १८ पाणी, पुरवठा आणि स्वच्छता विभाग वापरात बदल
    १९ सार्वजनिक आरोग्य विभाग जननी सुरक्षा योजना
    २० सार्वजनिक आरोग्य विभाग जननी शिशु सुरक्षा योजना
    २१ सार्वजनिक आरोग्य विभाग महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, अंतर्गत उपचारांसाठी नोंदणी, ई-पूर्वअधिकृतीकरण, आपत्कालीन उपचारांसाठी दूरध्वनीद्वारे नोंदणी
    २२ शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालेय प्रमाणपत्र परीक्षा II गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे
    २३ शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालेय प्रमाणपत्र परीक्षा तात्पुरती प्रमाणपत्र
    २४ शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालेय प्रमाणपत्र परीक्षेतील गुण पडताळणी
    २५ शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालेय प्रमाणपत्र परीक्षेच्या निकालानंतर उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मिळवणे
    २६ शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग परीक्षेला बसणारे खाजगी उमेदवार
    २७ कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभाग पशुवैद्यकीय रुग्णावर प्रथमोपचार


    आरटीएस कायदा २०१५ [263-केबी]